-
Katha Ani Jeevansutre (कथा आणि जीवनसुत्रे)
हे पुस्तक वाचकांना अस्सल भारतीय आणि तितकाच 'ग्लोबल' अनुभव देईल. तसेच मनोरंजनाबरोबर ज्ञानात भर पडल्याचाही आनंद मिळेल. भारत हा गोष्टींचा देश आहे. अनेक अख्यायिका, संस्कृती आणि परंपरांचे तो जन्मस्थान आहे. कथा हा भारतीय जनमानसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या पुस्तकात अतिशय प्रभावी अशा नऊ भारतीय 'सुपरहिरों'च्या कथा आहेत. ज्या वाचल्यानंतरही दीर्घकाळ तुमच्या मनात राहतील. त्यांचे संदर्भ, त्यातून मिळालेली समज कायम तुमच्याबरोबर राहील. या गोष्टींमध्ये उत्कट देशभक्ती, शौर्य, वाक्चातुर्य, भक्ती, त्याग, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि श्रद्धा यांचे दाखले आहेत. तुम्हाला माहीत आहे का की, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीरायाचे संवादकौशल्य असामान्य होते? छत्रपती शिवाजी हाराजांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग 'स्टार्ट-अप' सुरू करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहेत? व्यावसायिक ध्येयधोरणांत भावनिक बुद्धिमत्तेचा कौशल्यपूर्ण वापर कसा करावा याचे पाठ चाणक्यांच्या शिकवणीतून मिळू शकतात? अर्जुन, कबीर आणि आदि शंकराचार्य यांच्याकडे तुम्ही कधी 'नेते' आणि 'इन्फ्लुएन्सर्स' म्हणून पाहिले आहे का? दुर्दैवाने बहुतांशी लोकांना अज्ञात अशा राणी अव्यक्ता या आपल्या देशातील अतिशय कर्तृत्ववान स्त्रियांपैकी एक होत्या? भूतकाळातील काही सोनेरी पानांचे एका नव्या दृष्टिकोनातून चित्रण करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.