-
Chal Bas Ek Round Marun Yeu (चल बस एक राऊंड मारून येऊ)
माझ्या 'चल बस, एक राऊंड मारून येऊ!' या कथासंग्रहाचं १७ मार्च २०१९ ला प्रकाशन झालं आणि महिनाभराच्या कालावधीतच पाचशे पुस्तकांची पहिली आवृत्ती दणक्यात संपली. फोटोग्राफी व्यवसायानिमित्त होणाऱ्या भटकंतीतून टिपलेले अनुभव कथेच्या स्वरूपात वाचकांसमोर ठेवण्याचा मी केलेला हा प्रयत्न सर्वांच्या पसंतीस उतरला, याचं समाधान निश्चितच आहे. संवेदना प्रकाशनामार्फत पुस्तकांचं वितरण होतच राहिल, नव्या आवृत्याही निघतील, मात्र पुस्तकाची मागणी वाढल्यानंतर पुस्तक लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रकाशकाच्या सोबतीने माझंही काम आहे, असं मी मानतो. अशा वेळेस देश-विदेशातल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'ई-बुक' या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे मी ठरवलं आणि त्यासाठी सुप्रसिध्द 'ब्रोनॅटो' या ई-प्रकाशनसंस्थेची निवड केली. ब्रोनॅटोने आजपावेतो अनेक पुस्तके या माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचवली आहेत आणि आँन-लाईन वाचनाचा आनंद तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या वाचकांना मिळवून दिला आहे. वाचक आणि लेखक यांच्यातलं अंतर अशा नव्या पध्दतीने कमी होणं आजच्या नेटयुगात गरजेचंच आहे. माझं हे पहिलं पुस्तक या नव्या रूपात तुमच्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा! - सुहास मळेकर १७ एप्रिल २०१९