-
Chitevarchya Kalya (चितेवरच्या कळ्या)
‘चितेवरच्या कळ्या..!’ एका ‘ती’ची जीवनकहाणी – दैनंदिन जीवनातलं प्रत्येक पान अमानुष कृत्यांनी-आक्रोशानं-वेदनेनं भरलेलं – नवर्याकडून रोज रात्री होणारा जबरदस्तीचा संभोग - तिला होणार्या असाहाय्य वेदना - तिच्या सख्ख्या भावोजींबरोबरच्या नसलेल्या; परंतु नणंदेने निर्माण केलेल्या संशयामुळे होणारी बेदम मारहाण – याला विरोध करूनही दुपटीनं सहन करावा लागणारा छळ -गरोदरपणाच्या काळात तिच्या पोटावर बसणारा मार – आतल्या गर्भाची काळजी – सासू, नवरा, दीर, नणंद यांकडून फक्त हुंड्यासाठी होणारा अमानुष छळ व सासर्यांची काहीही न करू शकणारी हतबलता – माहेरी मोठं कुटुंब असूनही शेवटच्या क्षणी भोगावा लागलेला एकांतवास - भीषण नि भयानक घटना कशा भोगल्या? कशा सहन केल्या? रानटी माणसांमध्ये जगता जगता जीवन ज्योत मालवल्यावर समाज म्हणे `हा तर ‘हुंडाबळी’’ , परंतु, याने हुंडा मिळाला? याच अनुत्तरीत प्रश्नांमध्ये राख झालेली `ती’ व तिच्यासारख्याच ‘चितेवरच्या कळ्या..!’