-
The Ethical Doctor (द एथिकल डॉक्टर)
आरोग्यात काही बिघाड झाल्यास आपण थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो. ज्यांचा विश्वास असतो ते व गरजू, पैशाची नड असलेलेही डोळे झाकून डॉक्टर सांगतील तसे वागतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करतात व लागल्यास ताबडतोब ऑपरेशन करण्यास तयार होतात; परंतु प्रत्यक्षात आपलं शरीर व पैसा यांचं गणित का बसत नाही? निदानाच्या बाबतीत नेमकं बिघडतंय कुठे याचा कधीच थांगपत्ता त्यांना लागत नाही आणि दुसरीकडे ज्यांचा विश्वास नसतो ते दोन – तीन डॉक्टर बदलत राहतात; नाहीतर परिस्थितीला शांतपणे सामोरे जातात. यात मात्र तोटा फक्त रुग्णाचा होतो आणि रुग्ण रुग्णालयाच्या फेर्या मारत बसतो. या पुस्तकाचे उद्दिष्ट असे की, वैद्यकीय क्षेत्रातील असे काही अनुभव सामान्यांसमोर मांडून ठेवणे- जेणेकरून कोणताही रुग्ण स्वत:च्या आजाराबाबत गाफील राहणार नाही.