-
Bhor, Velhe, Purandhar Parisar Paryatan Margdarshika (भोर, वेल्हे, पुरंदर परिसर पर्यटन मार्गदर्शिका)
भोर वेल्हे तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेल्या या परिसरात गडकोट किल्ले, शिल्पकला असलेली मंदिरे, धरणे, लेण्या, घळी, धबधबे असे वैभव आहे. याच तालुक्याला लागून वाई, महाड असे तालुके आहेत. या पुस्तकात येथील पर्यटनस्थळांचाही समावेश केलेला आहे. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती व रंगीत छायाचित्रे आणि नकाशे दिलेले आहेत.