-
Sahvas Pratibhavantancha (सहवास प्रतिभावंतांचा)
'सहवास प्रतिभावंतांचा' या अशोक कोठावळे यांच्या पुस्तकात हृद्य व्यक्तिचित्रे आहेत, साहित्यसंस्थांचा आणि प्रकल्पांचा अनौपचारिक इतिहास आहे आणि वेगवेगळ्या गुणी माणसांवर प्रेम करण्याची क्षमता असणाऱ्या एका नम्र, सर्वसंग्राह व संवेदनशील लेखकाचे आत्मचित्रही आहे. त्यांच्या साहित्यिक वर्तुळाचा व संकल्पांचा असाच उत्तरोत्तर विकास होत राहावा आणि अनेक व्यक्तींना जवळ आणण्याच्या प्रक्रियेमुळे ते आयुष्यभर एक चांगले विद्यार्थी राहावेत अशी आशा करतो.
-
Athavaninchi Sathavan (आठवणींची साठवण)
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कडू-गोड प्रसंगांचा गोफ... गिरणगावातील बालपणापासून ते गिरगावातील तरुणपणापर्यंतचा प्रवास... लॉटरीची तिकिटे विकण्यापासून ते ग्रंथ प्रकाशनापर्यंतची व्यावसायिक कारकीर्द... बदललेल्या मुद्रणकलेपासून ते जुळलेल्या न जुळलेल्या पत्रिकेपर्यंतचे किस्से... सोसायटीतल्या सख्खे शेजारींपासून ते दुकानात येणाऱ्या ग्राहकांपर्यंतचे विविध नमुने... आस्तिक-नास्तिकतेपासून ते माणसातल्या हरवलेल्या माणुसकीपर्यंतची निरीक्षणे जगताना आलेले बहुरंगी अनुभव तटस्थ रसाळपणे मांडणाऱ्या ललित लेखांचं जाळीदार पिंपळपान म्हणजे आठवणींची साठवण. गेली चारं दशकं ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ विक्री, संपादन आणि विविध साहित्यिक उपक्रमांचं सातत्यपूर्ण आयोजन यात अग्रेसर असलेल्या 'मॅजेस्टिक' अशोक केशवराव कोठावळे यांची ही 'आठवणींची साठवण' त्यांची एक वेगळी ओळख वाचकांना करून देईल. हे पुस्तक वाचताना तुमच्या मनातला आठवणींचा गोफही अलगद उलगडेल....