-
Bhuiringani (भुईरिंगणी)
भुई रिंगिनी पुस्तक हे सदानंद देशमुख ह्यांचे दुसरे पुस्तक आहे जे कि मी वाचले आहे. आणि पुस्तकाच्या सुरवातीला मला वाटले मी नक्की काय वाचत आहे पण जसे पुस्तक पुढे सरकत जाते तसे आपल्याला कळत जाते कि देशमुख हे खरंच जबरदस्त ताकतीचा लेखक आहेत. त्यांचे पहिले पुस्तक जे मी वाचले ते म्हणज़े बारोमास ज्याच्या मध्ये एका शेतकऱ्याची कशी कुचंबणा होत जाते ते त्यांनी दाखवले आहे. ह्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. पदोपदी आपल्याला ही जाणीव होते की स्वतः देशमुख ह्यांचे नाते भुईशी किती खोल आहे. पुस्तकाचा गाभा हा आहे कि भारतीय पारंपरिक शेती जी होती तिचे नाते निसर्गाशी खूप घट्ट होते. पारंपरिक शेती मधले घटक परस्परावर खूप अवलंबून होते. शेतीचा प्रत्येक घटक ग्रामीण भागात साजरा केला जायचा पण जसे आपण पारंपरिक शेती पासून लांब झालो तसे गावाला बकालपणा तर आलाच पण शेतकर्याचे संकटे पण वाढत गेली. ह्या पुस्तकाची समीक्षा लिहणे खरंच खूप अवघड आहे कारण पुस्तका मध्ये इतक्या गोष्टींचा विचार केलेला आहे कि ज्याला शेतिविषेय कळवळ आहे त्यांनी हे पुस्तक खरंच एकदा वाचले पाहिजे.