-
Punha Ekada Stri Purush Tulana (पुन्हा एकदा स्त्री
मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय़ पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय़ मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणार्याग तिच्या कणखरपणाविषयी!
-
Gargi Ajun Jeevant Ahe (गार्गी अजून जिवंत आहे)
सार्या ब्रह्मवृंदासमोर याज्ञवल्क्याच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे, त्याला हैराण करणारे प्रश्न विचारीत अखेर त्याला सर्वश्रेष्ठत्वाचं प्रशस्तिपत्रक देणार्या गार्गीचा काळ खूप मागे पडला. पण गार्गी अज[...]
-
Maharshi Te Gauri ( महर्षी ते गौरी )
समाजानं घालून दिलेल्या रूढ-परंपरांच्या चौकटीच्या धाकाला न बधलेलं कर्वे घराणं. शिक्षणानं स्त्री स्वावलंबी बनेल या विश्वासानं स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणारे महर्षी कर्वे! संतती नियमन आणि समागम स्वातंत्र्य या दोन गोष्टींनीच स्त्रीला मानसिक, शारीरिक आरोग्य लाभेल हे आपलं मत तर्कशुद्धपणे मांडताना समाजाशी एकाकी झुंज देणारे र. धों. कर्वे! आणि सत्तेच्या खेळाला मान्यता न देता व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या गौरी देशपांडे! ' या तीन नावांनी कर्वे घराण्याच्या तीन पिढ्या स्त्री-स्वातंत्र्याच्या प्रश्नांशी जोडल्या गेल्या. त्यांच्या रक्तातून वारसाहक्कानं प्रवाही झाले केवळ पुरोगामी विचार. स्त्री आज थोडंफार मोकळेपणानं जगत असेल, तर त्या श्रेयात कर्वे घराण्याचा वाटा मोठा आहे. स्त्री-स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही पाने कर्वे घराण्यातील या तीन व्यक्तींचा इतिहासच आहेत.