-
Out Of The Box
क्रिकेट म्हणजे भारतीय नागरिकांचा श्वास असे म्हटले जाते. जगात कोठेही भारतीय संघ सामना खेळत असू दे, तो पाहण्यासाठी दूरचित्रवाणीसंचासमोर ठाण मांडून बसलेले क्रिकेटवेडे रसिक पाहायला मिळतात. या खेळाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची सवय हर्ष भोगले यांनी लावली. किक्रेटचे समालोचन कसे करावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. खेळ चालू असताना, संपल्यावर व अन्य वेळी ते जे विश्लेषण करतात ते वाचून, ऐकून सामना न पाहिलेल्यांनाही तो प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव येतो. आवाज, अचूक व चपखल शब्द, माहितीचे भांडार व महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे हर्ष भोगले हे नाव क्रिकेटशी संबंधित सर्वांनाच ओळखीचे आहे. त्यांच्या या अनुभवाचा प्रत्यय वाचकांना ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या पुस्तकातून येतो. यात त्यांनी या खेळातील अनेक ‘आऊट ऑफ’गोष्टी सांगितल्या आहेत. कोणालाही न दुखवता, कोणावरही टीका न करता व कोणावरही राग धरता त्यांनी या खेळाबद्दल, खेळाडूंबद्दल अनुभवकथन केले आहे.