-
Shabdancha Dhan (शब्दांचं धन)
१९६० साली मारुती चितमपल्ली पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे वनाधिकारी होते. वडगावपासून जवळच असलेल्या तळेगावी गो. नी.दांडेकर राहात असत. एके दिवशी मारुती चितमपल्ली यांनी गोनीदांच्या घरी जाऊन त्यांची ओळख करून घेतली. या ओळखीचं रूपांतर पुढं स्नेहात झालं. लेखनाचा श्रीगणेशा त्यांच्याच प्रेरणेनं केला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली थोडंफार लेखन करण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यांच्यामुळं 'शब्दांचं धन' करण्याचा छंद लागला. 'शब्दांचं धन' हे पुस्तक म्हणजे मारुती चितमपल्ली यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी झालेल्या भेटीगाठींचे चित्रण आहे. या मध्ये माडगूळकर, डॉ. सलीम अली, जी. ए. कुलकर्णी, जॉय अॅडम्सन, जेन गुडाल, जे कृष्णमूर्ती यांसारख्या जेष्ठ मान्यवरांच्या समवेत निसर्गविषयक, प्राण्यांविषयक झालेल्या चर्चांचा, गप्पांचा लेखाजोखा विविध लेखस्वरुपात मांडला आहे.