-
Eka Mungiche Mahabharat (एका मुंगीचे महाभारत)
"आपलं जीवन ही एक महाभारतासारखी कथा आहे अशी उत्कट जाणीव प्रत्येकाला असतेच असं नाही. मला मात्र थोडं जाणतेपण आल्यापासून माझंच नव्हे तर माझ्या आसपासचं सर्व ही एक महान कथा आहे नव्हे, तर कथासागर असं उत्कटतेनं जाणवत राहिलेलं आहे. या अनंत कथासागरावर माझ्या जीवनाच्या इवल्याशा होडक्यातून मी केलेल्या मुशाफिरीची ही कथा आहे , हा सारा कथासागर आत्मासात करण्यासाठी लागणारी प्रतिभा आणि कर्तुत्व एखाद्या व्यासाला लाभतं. मला या गोष्टी लाभलेल्या नाहीत ते उत्तरोउत्तर अधिकाअधिक जाणवत गेलेलं आहे पण असं असूनही जिद्ध मात्र बाळगली ती व्यासानं केलं तसं काही करण्याची. हे किती हास्यपद आहे हे कळण्याइतकी विनोदबुद्धी मला सुदैवान लाभली आहे. पण म्हणून ती जिद्ध काही कमी झाल नाही. म्हणून या आत्मकथेला मी 'एका मुंगीचे महाभारत' म्हटलं आहे. या मुंगीला जसा व्यासांचा संदर्भ आहे, मानवी जीवनाच्या व प्रयत्नांच्या हास्यास्पदतेचा संदर्भ आहे तसाच मर्ढेकरांच्या कवितेचाही आहे. खरं म्हणजे शेक्सपिअरपासून आयनेस्कोपर्यंत तिला अनेक वाड्मयीन संदर्भ आहे."