-
Chandralok (चंद्रलोक)
लक्षावधी वर्षांपूर्वी चंद्रजन्म कसा झाला? समुद्राला चंद्रामुळे भरती-ओहोटी का येते? चंद्राच्या लहरीप्रमाणे मानवी मनावर तरंग उमटतात का? सूर्यचंद्रांना लागणारी ग्रहणे, त्यांचा घास गिळायला टपून बसलेले राहू-केतू... यासारख्या गोष्टींचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? या व अशाच इतरही असंख्य प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे देतानाच गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये रंगत गेलेल्या अवकाशस्पर्धेचा आढावा घेणारा हा देखणा ग्रंथ. रशिया-अमेरिकेतल्या स्पर्धेचे विविध टप्पे, अपोलो-11 मोहिमेसारख्या आजवर योजल्या गेलेल्या सर्व चांद्रमोहिमा आणि त्यांचे यशापयश...या आणि अशाच इतरही असंख्य घटनांचा सुबोध परामर्श घेणारा हा बहुरंगी ग्रंथ.
-
Bramhand (ब्रम्हांड)
विश्व ही एक भव्य दिव्या कलाकृति आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाटक आहे. आशय या नेत्रदीपक नाट्यचा सूत्रधार कोनबरे असेल? विश्व नावाच्या कलाकृतीचा कर्ता कोण? विज्ञानाला या प्रश्नाची उत्तर माहित नाहित. पण विश्वाची ओझरत दर्शन मात्र विज्ञानाला झाल आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू हॉट आहेत. महास्फोटातुन आपल हे अफाट विश्व जन्माला आलं आणि आतिप्रचंड वेगान ते विस्तारु लागलं . चार बलांचा आणि मुल्कानांचा अगम्य खेल म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगल . विश्वाचे एकेक गूढ़ महतप्रयासंन उलगडून लागलं . विश्व सपाट आहे वक्र आहे? ते बंद आहे की खुल आहे. ? बिंदुवत स्तिथिने विश्वाचे अंत होइल? की निरंतर विश्व विरून जाइल? विश्वमधिल मानावंच आगमन ही नैसर्गिक घटना आहे. ? की मानव निर्मितीसाठी विश्वाचे उपक्रम आहे? प्रश्नाची ही निरंतर हॉट आहेत. अजुन काय काय समजायचे बाकी आहे.? खरं म्हणजे विश्वाचे कोड मानवाला उलगडले काय? या सार्या प्रश्नाचा धावता आढावा हांच ' ब्रम्हांड , उत्पति , स्तिथि आणि विनाश ' या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा आहे.