-
Bazar... (बाजार)
हे शतक उजाडताना मात्र सॅम्युएल्सन असंबद्ध वाटू लागला. सेन्सेक्स-निफ्टी, GDP-GNP वेगवेगळे महागाई निर्देशांक वगैरे समजून घ्यायला गेलं की फारदा निष्कारण तपशिलानं मुद्दे धूसर केले जात आहेत, दडवले जात आहेत, obfuscate केले जाताहेत, असं वाटायचं. मग फापटपसारा हटवणारी रासवट-मराठी cut the crap वृत्ती वापरून आकलन सोपं करायला धडपडू लागलो. थोडं जमायचं, खूपसं सुटून जायचं. अशातच 2008 ची मंदी आली. मी निवृत्त झालोच होतो, त्यामुळे त्या गोंधळावरची हलकी, लोकप्रिय पुस्तकं वाचायला वेळ होता. आणि अशी पाश्चात्त्य अर्थशास्त्राची कमकुवत, कधीकधी बदमाश अंगं उघड करणारी पुस्तकं, वृत्तपट, चित्रपट वगैरेंचा सौम्यसा ‘पाऊस’ गेलं दशकभर पडतोच आहे! त्या सार्यातून जे चित्र दिसायला लागलं ते म्हणजे हा ‘बाजार’. भोवताली जे दिसतं ते, स्वतःचे अनुभव, चित्रपटांमधली गाणी आणि कवनं, इतर मार्गांनी पीडितांनी साधलेली अभिव्यक्ती, अशा सार्यांचं हे मिश्रण आहे. एक ढोबळ रचना, structure आहेही; पण मुळात हा गप्पा, किस्से-कहाण्या, ‘गीतों भरी कहानी’ वगैरे अनौपचारिक पद्धतींनी माझं आकलन मांडायचा प्रयत्न आहे.
-
Udya (उद्या)
संख्या,सर!दोन अब्ज माणसांचा देश आहे. मी फक्त सर्वेलन्सच पाहतो, तरी आपण खूप कमी पडतो. आज कोणतीही फ्रेम पहा. नव्वद-पंच्याण्णव टक्के रागात,ताणात! आपण मेगा,टेरा,गिगा करत प्रचंड माहिती जनरेट करतो. ती तपासायचे प्रोग्राम्स रचतो. ते सांगतात नव्वद-पंच्याण्णव टक्के संभाव्य गुन्हेगार! अशा इंटर्नल कॉम्पिटीशननं सगळे तेजतर्रार राहतात. एकूण प्रोसेसच लीन आणि मीन होते. मज काई पाते नाई. आता मीन बोल्ल तं मतलब होते हरामी! आपल्या माणसानं कडक्या रोड्पनात जावं , स्वभावानं हरामी व्हावं. काऊन? चाकं पिल्लाच्या दोन्ही बाजूंनी गेली. तीही योजना पूर्वक नाही, तर सहज. पिल्लू उठून आईकडे पळाल. आज, आत्ता वाचलंही , उद्या...
-
Kahani Manavpranyachi
विश्वाचा जन्म कधी झाला हे गूढ असले तरी जगभरातील शास्त्रज्ञ त्यांची उकल करीत आहे. त्याचे उत्तर हळूहळू उलगडत आहे. मानवाच्या अस्तित्वानंतर अनेक शोध लागले. त्यातून आजचे आधुनिक जग साकार झाले आहे. ज्ञान - विज्ञान, तत्वज्ञान - तंत्रज्ञान यांच्या विकासातून अनेक असाध्य गोष्टी सध्या झाल्या आहेत. यातून मानव 'सिव्हिलायझेशन' कडे वळला. म्हणजेच सभ्यता, नैतिकता मानू लागला. पण ह्या गोष्टी अहिंसेला पूरक असल्या तरी त्या स्थळ, काळ, व्यक्तीसापेक्ष असल्याने हिंसेचे मूळ यातून फुटले. विश्वाची निर्मिती, माकडापासून मानवाची अत्तापर्यत जी उत्क्रांती झाली त्याचा शोध अनेक शास्त्रज्ञ आजही घेत आहेत. हा प्रवास गूढ, रहस्यमय असून, 'नंदा खरे' यांनी 'कहाणी मानवप्राण्याची' मधून त्यांची झलक दाखवली आहे. सहा विभागात त्य आणि संपूर्ण विश्वाचा, मानवाचा इतिहास, भूगोल रंजक शब्दांत, आवश्यक तेथे छायाचित्र, नकाशे यांच्या मदतीने कथन केला आहे.