-
Devraichya Savalit (देवराईच्या सावलीत)
माणसाच्या शारीरिक व्याधी उपचाराने बऱ्या होतात; पण मानसिक आजार बरे झाले तरी अशा माणसांना सामाज पूर्णपणे स्वीकारत नाही, हे वास्तव आहे. स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात जाण निर्माण करण्याचे काम सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी देवराई या चित्रपटातून केले आहे. या आजाराचे स्वरूप, त्यावरील उपचार, स्किझोफ्रेनिक मांसाकाला समजून घेणे, त्याला भावनिक आधार देणे कसे गरजेचे आहे, याचबरोबर यावरील उपचार याचे चित्रण यात आले आहे. वैद्यकीय, मानसीक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या या चित्रपटाने मोठी उंची गाठली. याचा अनुभव कागदावर उतरवून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी 'देवराईच्या सावलीत' मधून वाचकांपुढे ठेवला आहे. चित्रपटाचा रसास्वाद, भावे व सुकथनकर यांचे कथन, केस स्टडी, विज्ञानाच्या नजरेतून चित्रपटाचे विश्लेषण, उपचाराच्या दिशा, रुग्णांचे अनुभव यातून या आजाराविषयी जागृती, रुग्णांची मनोव्यथा, कुटुंबाची वेदना व अशा आजाराशी लढण्याचे सामर्थ्य मिळते.
-
Mittule Aani Rasal (मितुले आणि रसाळ)
काही स्वत:चे अनुभव आणि काही सहवासातल्या व्यक्ती यांच्याविषयीचे हे लेखन. म्हणून डॉ. आनंद नाडकर्णी या संग्रहाला ललितलेखसंग्रह म्हणतात. मितुले’ हा शब्द ज्ञानेश्वरीतला. त्याचा अर्थ मोजका. त्याला लेखकाने र[...]
-
Manogati
मनोगती… म्हणजे मनाची गती… क्षणामध्ये आठवणींचे खंड पार करणारी… भविष्यातल्या भरार्या मारणारी… कधी वर्तमानाच्या आडोशाला बसणारी… वर कधी स्वतःमध्येच गिरक्या घेणारी. मनोगत म्हणजे मनातले विचार… आपल्या भावना आणि वर्तनाला आकार देणारे विचार. कधी विवेकाने वागणारे, तर कधी विनाशाकडे धावणारे… मनोगती म्हणजे मनोगतामध्ये, आत जाऊन घेतलेला वेध! विकाराकडून विकासाकडे नेणारा… आधुनिक मानसशास्त्र, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, तसेच महाराष्ट्राचा भागवत्धर्म ह्यांचा समन्वय साधणारा वैयक्तिक आणि सामाजिक मनोस्वास्थ्याचा उपयुक्त आलेख. अनुभवी मनोविकासतज्ज्ञाच्या अनुभवांचे आणि प्रत्यक्ष संवादसत्रांचे प्रभावी रेखाटन… मनोगती।