-
Pakshi,Pashu Aani Daku (पक्षी,पशु आणि डाकू)
वीरप्पन हळुवार आवाजात उतरला : " मी हत्तींना मारल्याला अनेक वर्ष लोटली आहेत. पण माझ्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत." वन्यजीव छायाचित्रकार कृपाकर आणि सेनानी यांचं एका रात्री बंदीपुर अभयारण्याच्या सीमेवर सीमेवर असलेल्या त्यांच्या घरातून अपहरण केलं गेलं ते समजुतीच्या घोटाळ्यातून. हे अपहरण केलं होतं वीरप्पन या भयंकर डाकूनं. त्याची अशी समजूत झाली होती की छायाचित्रकार द्वयी म्हणजे महत्वाचे सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे त्याचा डाव असा होता की त्यांना ओलीस धरून भरघोस खंडणी आणि माफ़ी या दोन्ही गोष्टी वसूल करायच्या. वीरप्पन आणि त्याची टोळी या ओलिसांना घेउन जंगल तुडवत राहिली. बाह्य जगाशी त्यांच्या संपर्क होता तो एका जुन्या रेडियोद्वारा. ज्या वीरप्पनंन जवळ जवळ अडीचशे माणसांना मारल होत., तो सरकारनं आपल्या मागण्यामान्य कराव्या म्हणून वेगवेगळे डाव रचत असताना दोन्ही ओलीस मात्र कर्नाटक आणि तमिलनाडुच्या जंगलातील जैववैविध्याचा अनुभव घेत होते. त्याच्या बरोबर या प्रवासात विराप्पनाला जवळून बघण्याची संधी मिळाली तेव्हा त्याच्यामध्ये एकवटलेल्या क्रोर्य आणि माणुसकी या परस्पर विरोधी भवनांच्या दर्शनानं ते कोडयात पडले. कृपाकर आणि सेनानी यांच जग वीरप्पन आणि त्यांच्या टोळीपेक्षा पूर्णपणे वेगळें होत.पण तरीही या अपहरण नाट्यात अपहत आणि अपहरणकर्त यांच्यात एक अनामिक स्नेहबंध निर्माण झाला. ' पक्षी, पशु , आणि डाकू' हे पुस्तक म्हणजे कुप्रसिद्ध डाकू आणि त्यांच्या टोळीबरोबर असलेल्या नर्म आणि हृदयस्पर्शी अनुभवांच चित्रण करणारी सहसगाथा आहे.
-
Aarogyasampanna Adhunik Jeevanakarta Ayurveda
रस्त्यावर उघडयावर तयार होणारे नानाविध खाद्यपदार्थ (फास्ट फूड), आधुनिकतेच्या नावाखाली मैदा, मार्जरीन- बटर, दुधयुक्त भाज्या / फळे इत्यादी घटक असलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वेळेच्या अभावामुळे कौटुंबिक सुसवांद साधण्यात अडचणी, कम्प्युटर- दूरदर्शनचा जीवनात नको तेवढा शिरकाव- या सर्वांतून मानसिक ताणतणाव, समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सखोल, सर्वसमावेशक तसेच आधुनिक, सुलभ, रंजक, शास्त्रीय परिभाषेत सर्व स्तरावरच्या वाचक/ अभ्यासकांच्या शंकांचे निराकरण करणारे व एकूणच नवी आगळी वेगळी तथा पूर्ण व्यवहार्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक पुस्तक.