-
Bhas Abhas (भास आभास)
आकाश दिसतं पण असत नाही .वारा असतो पण दिसत नाही . ज़गताना काही अनुभव येतात ,प्रीतीचे -भीतीचे . अनुभवांना रंग असतात ,गंध असतात ,स्पर्श असतात . रंग दिसतात , गंध जाणवतात , स्पर्श जीवघेणे असतात . अनुभवांना आभा असते ;म्हणून त्यांचे आकाश असते . अनुभवांना आभास असतात ;म्हणून शब्दांना प्रकाश असतो . असेच काही भासमान, काही आभासमान अनुभव ....