-
Asa Asava Jodidar (असा असावा जोडीदार)
एलियट काट्झ यांनी ‘बीइंग द स्ट्राँग मॅन ए वुमन वाँट्स’ या विचारांना चालना देणार्या पुस्तकात ‘महिलांना नेमकं काय हवं असतं?’ या मुद्द्याचा वेध घेतला आहे. एका निरोगी स्त्रीला कणखर पुरुष हवा असतो. निर्णय घेईल असा पुरुष, ज्याच्यावर अवलंबून राहता येईल असा पुरुष, आपल्या जवळच्या माणसांसाठी सर्वोत्तम असंच ठरवेल असा पुरुष, योग्य गोष्टी करेल असा पुरुष - केवळ सोप्या, लोकप्रिय, फायदेशीर गोष्टी करणारा नाही. अनादि काळापासूनच्या शिकवणीतून, काट्झ यांनी वाचकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-पुरुषांच्या भूमिकांबाबत सध्या होत असलेल्या चर्चांतून निर्माण झालेला संभ्रम. हजारो वर्षांपासूनच्या उपयुक्त तत्त्वांचा आधार घेऊन, अधिकार न गाजवता, अपमानास्पद न वागवता, नियंत्रित करण्याचा प्रयत्न न करता, महिलांना हवा असलेला पुरुष कसं बनायचं, हे काट्झ यांनी आधुनिक पुरुषांना सांगितलं आहे.
-
Nirgathi Ani Chandrike Ga Sarike Ga (निरगाठी आणि च
गौरी देशपांडे ह्यांच्या ह्या दोन दीर्घकथांपैकी ‘निरगाठी’ ह्या कथेत एका कुटुंबातल्या आईनं लिहिलेली पत्रं, डायरी आणि स्वगतं ह्यांतून कथा उलगडते. मुलांच्यामुळं आईवडिलांना जीवनात विविध अनुभव येतात, त्यामुळं त्यांचं जीवन सार्थकी लागतं, हे लेखिकेला अधोरेखित करायचं आहे आणि त्यात ती यशस्वीही झाली आहे. दुसरी कथा ‘चंद्रिके गं सारिके गं’ ही मनाला चटका लावणारी आहे.
-
Raaz Mahal (राझ महाल)
आग्रा, भारत – ताजमहालाचं शहर. ब्यूरो ऑफ आर्किऑलॉजिकडे (बीओए) माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत एक विचित्र याचिका येते, ज्यात ताजमहाल या जागतिक वारसा स्थळाद्दलची आख्यायिका सिद्ध करणारे अधिकृत ऐतिहासिक पुरावे जाहीर करण्याची मागणी केलेली असते. ब्यूरो या याचिकेची जबाबदारी विजय कुमार या अत्यंत हुशार, पण स्वच्छंदी पुरातत्त्वशास्त्रज्ञावर सोपवते. हे आरटीआय प्रकरण दिसतं तितकं साधंसरळ नसल्याचं विजय कुमारच्या लक्षात येतं. काही गूढ मृत्यू व इंटरपोलचा सावधगिरीचा इशारा यामुळे प्रकरण आणखी चिघळते. सत्य शोधण्यासाठी विजय कुमार आंतरराष्ट्रीय शोध-दौर्यावर निघतो त्या दरम्यान तो स्वतःशिवाय कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कुणीतरी विजय कुमारला जाणीवपूर्वक अडकवलं आहे का? त्याचा जीव धोक्यात आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं, तो सत्य सर्वांसमोर आणू शकेल की... ते कायमस्वरूपी एक गुपितच राहील... राझ?
-
Factory Girls (फॅक्टरी गर्ल्स)
छांग यांनी त्यांच्या कुटुंबाच्या चीनअंतर्गत स्थलांतराची आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या स्थलांतराची कहाणी कुशलतेनं गुंफली आहे. चीनमध्ये अंदाजे १३ कोटी स्थलांतरित कामगार आहेत. त्यांपैकी जवळजवळ सगळेच तिशीच्या आतले आहेत. फॅक्टरी गर्ल्स पुस्तकामध्ये लेस्ली टी. छांग यांनी प्रामुख्याने दोन तरुणींची जीवनकथा उलगडून या कामगारांची कहाणी मांडली आहे. तोंगकुआन या औद्योगिक शहरामध्ये या दोघी तरुणी करिअरमध्ये असेम्ब्ली लाइनपासून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नांत असतानाच्या तीन वर्षांतला त्यांचा जीवनसंघर्ष लेखिकेनं त्यांच्या सोबत राहून प्रत्यक्ष अनुभवला. छांग यांनी स्वतःचं रुग्णालय असलेला महाकाय स्नीकर कारखाना, विद्यार्थी अतिशय समर्पणानं शिकत असलेले इंग्रजीचे वर्ग, आणि मुलींना घर सोडून बाहेर पडायला लावणारी गरिबी आणि रिकामपणानं ग्रासलेली शेतीप्रधान गावं अशा ठिकाणांची सफर आपल्याला घडवली आहे. जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचे असलेले फॅक्टरी गर्ल्स हे पुस्तक, ग्रामीण भागातल्या गावांपासून शहरांकडे होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळे चिनी समाजामध्ये कसे बदल घडवत आहे, हे दर्शवते.