-
Indiana Jones And The Temple Of The Doom
'त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा.' समोर उभे असलेले धर्मगुरू इंडियानाला म्हणाले. 'मी ?' इंडियाना आश्चर्यचकित होत पुढे म्हणाला, मी ती मदत तुम्हाला काय करणार ? 'आमच्या देवांनी ती सूचना आम्हाला दिलेली आहे.' काहीसे स्मित हास्य करीत ते धर्मगुरू पुढे म्हणाले - 'तोच हे आमच्यावर आलेले संकट थांबवू शकेल.' काही क्षण ते धर्मगुरू बोलायचे थांबले. नंतर ते शांत स्वरात पुढे म्हणाले - 'तुम्ही आमच्या प्रदेशात इथे आकाशातून खाली आलेले आहात !' इंडियाना जोन्स ते ऐकून आश्चर्यचकित झाला.