-
Priya Mitra
आपल्या छोट्याश्या आयुष्याच्या परिघाताही अनेक घटना, प्रसंग घडत असतात. अनेक व्यक्ति भेटत असतात. आपण खुप काही पहात असतो, ऐकत असतो. मनात त्यामुळे काही तरंग उठतात. विचार चालु होतो. त्या त्या वेळी त्यामुळे आपला काही दृष्टिकोन बनत जातो. त्याच्याच ह्या काही कथा, गेल्या पंचवीस तीस वर्षात हौसेने मी लिहिलेल्या विविध नियात्कालिकातुं प्रसिध्हा झालेल्या कथांचा हां संग्रह- प्रिय मित्रा. कथा हा अगदी लवचिक साहित्यप्रकार आहे. कविता, नाटक, निंबंध, लघुनिंबंध ह्याकदेही तो वळतो पण काहीतरी एकात्म पारीणामाकडे संकेत करत असतो. त्याचा जीव अगदी पावलापुरता प्रकाश एवढाच असेल पण त्यानेही जीवऩानुभवाच्या वाटेवर दिलासा दिलेला असतो. अगदी प्रिय मित्रासारखा.