-
Shivarayanchi Yuddhaniti (शिवरायांची युद्धनीती)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची, युद्धशास्त्राची आजही आवश्यकता आहे. शिवरायांची युद्धनीती या नवचैतन्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि डॉ. सच्चिदानंद शेवडे व दुग्रेश परुळेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे. त्यांच्यासारख्या सावध राज्यकर्त्यांची आज या देशाला नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी आजही त्यांची युद्धनीती जाणून घेण्याची गरज आहे. शिवरायांनी त्या काळात सर्व शाहींना पायाखाली दाबून स्वराज्याची निर्मिती केली. या पुस्तकात अनेक विषय अभ्यासपूर्ण हाताळले असून, शिवरायांच्या विविध पैलूंवर, त्यांचे सनिकांवर असलेले प्रेम, काळजी आणि प्रसंगी कठोर निर्णय घेत असताना न डगमण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आपल्या मावळ्यांच्या हितासाठी त्यांनी सर्व गड-किल्ले तहात देण्याचे कबूल केले. दिलेला शब्द पाळण्यासाठी ते प्रसंगी कैद झाले, मात्र वचन पाळले.