-
Pahila Numberkari (पहिला नंबरकारी)
खून, चोरी, घरफोडी, लूट, खंडणी, किडनॅपिंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया? 16-17 वर्षाच्या मुलाला फाशी द्या, त्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच ना? या दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातात. सामान्य सोडा पण कायदे यंत्रणा, त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, मुलांना ज्या सरकारी निरीक्षण गृहात ठेवलं जातं तिथली यंत्रणा...कसा असतो सगळ्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन? ज्या कृतीमुळे या मुलांचं सगळं आयुष्य बदलून जातं ती खरंतर त्यांच्याकडून का होते? काय असतं या मागचं वास्तव? त्यांना या वाटेवर जायला प्रवृत्त करणारे कोण आहेत? या आणि अशा काही प्रश्नांना थेट आणि परखडपणे भिडून लिहिलेलं हे पुस्तक मराठीतलं किंबहुना भारतीय भाषेतलं पहिलंच पुस्तक आहे. मुलांना या अंधार्या जगात ढकलणार्या वास्तवाचा या मुलांशी बोलून, त्यांना समजून घेतलेला हा वेध प्रत्येकानं वाचलाच पाहिजे तरच या पुस्तकात असलेल्या कुणाल, गोट्या, जयेश, पराग, अनिल, अमर, रोहन, जयदीप, शरद व अन्य मुलांच्या जगण्यातल्या भीषणतेची कल्पना येऊ शकेल. ’प्लॅटफॉर्म नं झीरो’ च्या लेखिकेचं विधीसंघर्षग्रस्त मुलांचं आयुष्य उलगडून दाखवणारं हे पुढचं पुस्तक! प्रत्येक संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारं आहे!! म्हणून ते विकत घेऊन वाचायलाच हवं!!!
-
Platform Number Zero
रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्लॅटफॉर्मवर किंवा कुठेतरी वळचणीवर आपलं बेवारस आयुष्य जगू पाहणा-या मुलांचं जीवन रुळावरून पुरतं घसरलेलं असतं. कोणत्या ना कोणत्या कारणाने घर सोडून आलेली ही मुलं स्टेशनच्या आस-याने आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिथल्या उघड्यावाघड्या जगण्यामुळे त्यांना आयुष्यभराच्या सर्व ब-यावाईट प्रसंगांना बालपणीच सामोरं जावं लागतं. त्यात त्यांचं बालपण करपून जातं. अशाही परिस्थितीत ही मुलं सन्मानाने जगण्याचा प्लॅटफॉर्म शोधत राहतात, पण या मुलांची परवड काही केल्या थांबत नाही. किशोर, जग्गू, अँथनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणा-या कहाण्या...