-
Tumchi Jaat Kay (तुमची जात काय)
कवितेचा 'आदिबंध' जपणारे जे काही निवडक कवी आहेत, त्यामध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा समावेश करावा लागतो. त्यांच्या या पाचव्या संग्रहातील अवकाश 'खोलवर प्रतिक्रियात्मक' असा आहे. त्याचे रूप वर्तमानी आहे. वर्तमानात आपल्या प्रतिक्रियात्मकतेला घेऊन उभे राहणे आणि तत्त्वज्ञानाला सांस्कृतिक व्यवहारातील जागा उपलब्ध करून देणे हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद सिद्धान्ताचे मुख्य लक्षण. या कवितेतील आशयसूत्राचा मुख्य धागा तोच आहे. ही कविता आत्मचरित्रात्मक वाटत असली तरी फॅसिस्ट जातीय प्रवृत्तींबरोबर दोन हात करतानाचा स्वर मात्र समताधिष्ठित आहे. ८०-८५ नंतर मराठी कविता म्हणून थेट हिंदी कविता लिहिणाऱ्या अनेकांना लिंबाळे यांची ही कविता अनुकरणीय वाटायला हवी, असा ऊर्जास्त्रोत तिच्यात आहे.