-
Swadesh (स्व..देश)
‘ब्रेनड्रेन’ऐवजी ‘ब्रेनगेन’ सुरू झाला आहे. अनेक अनिवासी भारतीय भारतात परतू लागले आहेत. त्यात मराठी माणसे आलीच. अशा पंचवीस, घरट्यात परतलेल्या व्यक्तींनी आपल्या कहाण्या या पुस्तकात कथन केल्या आहेत. त्यांचे विश्व वेगळेच आहे . त्यांना आपल्या या जगाशी जुळवून घ्यायचे आहे . त्यांचा तो प्रयास कहाण्यांमधून स्पष्ट दिसतो … … आणि म्हणूनच बहुधा त्यांचा एक प्रतिनिधी आणि या पुस्तकाचा संपादक भूषण केळकर म्हणतो , ''आपण भारतातील रहिवासी असू , अनिवासी भारतीय (NRI) असू वा Nest Returned Indians,आता , आपली 'नर्मदापरिक्रमा ' महाराष्ट्रात सुरु झाली तरी ती खऱ्या अर्थानं पूर्ण होणार आहे मिसिसिपी , कोलोराडो , नाईल, होहँगहो ,टेम्स आणि डॅन्यूबच्या पत्रांत ! या नव्या साप्तगंगांच्या जलोघन महाराष्ट्राच्या अन पर्यांयान भारताच्या यशाचा अभिषेक सिध्द करण्यास आपण सर्वांनीच एकोप्यान काम करायला हवं!''