-
Chandrabudhicha Blog (चंद्राबुडीचा ब्लॉग)
कथांचा घाट आणि विषय़ यांचे मोठया प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. पण कथांची बीजं छोट्या गावातही असतात. त्यातून विनोदी अंगानी जाणाऱ्या गावातल्या कथा लिहिण्यासाठी केवळ निरीक्षण आणि भाषाशैली पुरेशी नसते; ती भाषा जगलेली असावी लागते. अस्सल वऱ्हाडी भाषा जगणारे आणि ती समर्थपणे उतरवणारे लेखक ही ओळख अशोक मानकरांनी कमावलेली आहे. या कथा लिहिताना ग्रामीण भागावर नव्या तंत्रज्ञानाचा झालेला परिणाम, त्याचं चित्रण करण्यात मानकरांचा हातखंडा आहे. वऱ्हाडी ठेचा आवडणाऱ्यांना आणि त्याची चव न चाखलेल्यांनाही हा कथासंग्रह सारखाच आनंद देईल.
-
Ganpat Family In New York (गणपत फॅमिली इन न्यूयार्
पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागातल समाजजीवन, माणसाचे इरसाल नमुने प्रथितयश लेखक शंकर पाटील विलक्षण पद्धतीने उभे करत त्याच्या शब्दाशब्दातून व्यक्तिरेखा जिवंत होत वाचकासमोर साकारत. त्या मातीचा गंध शब्दांत प्रभावीपणे टिपणातून हे घडत असे. वऱ्हाड-विदर्भातील आणि समाजजीवन अशाच प्रकारे आपल्या विनोदी कथेतून कुणी साकारत असेल तर ते अशोक मानकर. विविध मासिक आणि दिवाळी अंकातून अस्सल वऱ्हाडी बाजाचा लेखन अशोक मानकर करत आले आहेत. 'गणपत फॅमिली इन न्युयोर्क' या मधून अशोक मानकरांनी 'वऱ्हाड एक्स्प्रेस' वाचकांना रंजक सैर करून आणल्याशिवाय राहणार नाही..