-
Mantrshaktine Rognivaran (मंत्रशक्तीने रोगनिवारण )
बरीच स्तोत्रे, कवच, मंत्र, याच्या ४५, दिवसाचे अनुष्ठान करून सिद्ध केलेल्या अनुष्ठानाच्या प्रभावाने रोग निवारण करण्याचे अनेक उपाय व भरपूर माहिती दिलेली आहे. हे उपाय श्रद्धेने केले तर निश्चितच साधकाला ४५ दिवसाच्या आतच रोग निवारण होते आणि सिद्धी कशी प्राप्त होते इत्यादीची संपूर्ण माहिती.
-
Baara Rashi Sattavis Nakshtre ( बारा राशी सत्तावीस
बारा राशींचे विस्तृत विवेचन , जन्म ते मृत्यू पर्यंतच्या घडामोडी प्रत्येक नक्षत्रातील ग्रहांचे परिणाम या विषयी परिपूर्ण माहिती या पुस्तकात आहे .
-
Bruhat Sahadev Bhadali ( बृहत् सहदेव भाडळी )
सातशे वर्षांपुर्वी मार्तंड जोशी नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुले म्हणजे सहदेव-भाडळी ही होय. त्यातील सहदेव हा ब्राह्मण स्त्रीपासून तर भाडळी ही अंत्य जातीतील स्त्रीपासून झालेली मुलगी होय. तीने वडीलांकडचे ज्योतिष शास्त्राचे ज्ञान आत्मसात केले व ते नंतर सहदेवाला शिकविले. ह्याबाबत एक कथा प्रसिध्द आहे की सहदेवाने एका आध्यात्मिक उन्नतांची एक कवटी आणली होती व तो उगाळून पित होता व ती कवटी भाडळी ने ती चोरुन कुटून पिठ करुन पिऊन टाकली व तीला ज्योतिष्याचे ज्ञान प्राप्त झाले. परंतू तिच्या रचनांवरुन ही घटना सत्य असल्याचे पुरावे मिळत नाहीत. तिच्या रचनांमध्ये अनेक समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये व आधीच्या ग्रंथामध्ये प्रगट झालेले विचार आपल्याला दिसतात. तिने केलेल्या रचनेवर तिच्या सामाजिक स्थानाचा परिणाम झालेला दिसून येतो. तिचे ज्ञान हे नंतर ''सहदेव-भाडळी'' ह्या नावानेच प्रसिध्द झाले आहे.
-
Ravan Sanhita ( रावणसंहिता )
रावण हा महाभ्यासक ,घोर तपस्वी आणि महाज्ञानी होता त्याच्या महा ज्ञानाचे सार म्हणजेच हा ग्रंथ " रावण संहिता" होय .