-
Chicken Soup For The Womens Soul
स्त्रीची व्याख्या अनेक प्रकारांनी करता येईल. विद्यार्थिनी, कन्या, मौत्रीण, पत्नी, आई, गृहिणी, व्यावसायी! प्रत्येक रूप हे खास अलौकिक असे असते. तरी त्यांतही एक असा सामान्य धागा असतो. तो प्रत्येकीच्या स्वभावात असतो. प्रेमाचे बंध हळुवारपणे जपणारी, आजीवन मौत्री किंवा नाते निभावणारी, निवडलेल्या क्षेत्रांशी बांधिलकी घट्ट करणारी ही स्त्री! कौटुंबिक जीवनात फुलोरा फुलवणारी, त्याच बरोबर सामाजिक जीवनही सुसह्य करणारी! New York Times च्या Chicken soup for the Soul ह्या मालिकेत वेगवेगळ्या शीर्षकांखाली भावभावनांचे खास मिश्रण आहे! या पुस्तकामध्ये स्त्रीशी निगडित असलेल्या सार्या गुणवौशिष्ट्यांचे मार्मिक चित्रण आढळते. स्त्रीच्या आत्म्याची मंगलता व सौंदर्य इथे प्रगट होते! व्यावसायिक असो की गृहिणी, बालिकेपासून वृद्ध स्त्री पय|त सगळ्यांना हे अनुभव भावतील. ह्यातून त्यांना स्फूर्ती, आनंद मिळेल. इतकेच नव्हे; तर स्वत:चीही ओळख होऊ शकेल. ह्या अनुभवांची सोबत दीर्घकालपर्यंत स्त्रियांना मिळू शकेल.
-
Chicken soup For The Soul at Work
माणसं काम करताना पाट्या टाकतात असं जरी दिसत असलं तरी सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणपूर्वक, सेवानिवृत्तीने काम करतो. त्या कामाचे कार्यात रूपांतर होते, त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीनं करणं ही उदात्त कार्यसंस्कृती. अनुभवांच्या खजिन्यातून इथे उलगडत जाते अनोखी कार्यप्रणाली. साहस, करूणा आणि प्रेरणा देणा-या मनाला तरतरी आणि जगायला बळ देणा-या त्या अनुभवांना सलाम!