-
Jane Kaha Gaye Wo Din (जाने कहां गये वो दिन)
वर्तमानकाळ चैतन्यशीलपणे जगतानाही आपल्या प्रत्येकाच्या मनात लहानपणी किंवा तरुणपणी जी पुस्तके वाचली, जे संगीत ऐकले अथवा जे नाटक वा चित्रपट पहिले, त्यांच्या आठवणी मनात रुतलेल्या असतात. `जाने कहाँ गये वो दिन' या पुस्तकात नामवंत लेखक बाबू मोशाय उर्फ हेमंत देसाई यांनी अमिताभ, प्राण, वहिदा रहमान, धर्मेंद्र, शशी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर, विनोद खन्ना, प्रदीपकुमार असे अनेक कलावंत तसेच गीतकार आनंद बक्षी यांच्यावर देखील आपल्या रसिल्या शैलीत लिहिले आहे. दुर्मिळ माहिती, भन्नाट किस्से आणि वेधक व्यक्तिचित्रे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
-
Suhana Safar (सुहाना सफर)
नूरजहाँ, लता मंगेशकर, सुरैया, मन्नाडे, गीता दत्ता, अनिल विश्वास, मंगेश देसाई, दिनानाथ मंगेशकर, ते थेट आजच्या जमान्याचं संगीत देताना एक आब राखून असलेला रहमान.... अशा अनेकांवर लिहिलेले हे लेख वाचकांनाही एक सुंदर सफर घडवून आणतील.
-
Chandrat ( चांदरात)
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे 'बाबू मोशाय' हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ,वितरक,अशा, चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती! या सर्वांविषयी लिहिताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच;शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात. 'चांदरात' या बाबू मोशाय यांच्या लालीतरम्य शैलीतील पुस्तकाला, त्यातल्या अनमोल अशा खानिज्याला म्हणूनच संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या भाषेची ताकद वाचकांना बांधून तर ठेवतेच, शिवाय त्यांच्या वाचनश्रीमंतीत भरही घालते.