-
Geetkrushnayan
योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे यश, आरोग्य, सुख आणि समाधान यांचं जणू प्रतीकच. किंबहुना गोविंद हे आनंदाचंच सगुण स्वरूप ! अशा त्या परमेशाचं विश्वमोहक व्यक्तिमत्त्व, देदिप्यमान चरित्र आणि मार्गदर्शक शिकवण जनमानसापर्यंत मनोरंजक पद्धतीने पोहोचविण्याच्या आर्तातून जे निर्माण झालं तेच हे 'गीतकृष्णायन' ! 'गीतकृष्णायन' हा एक पुष्पहार आहे गोष्टीरूप धाग्यात गीतसुमने गुंफलेला ! ह्यातील गीतं कृष्णाच्या संपूर्ण आयुष्यातील निवडक प्रसंगांवर आधारित असून मराठी भाषेच्या पद्यदालनातील अनेकविध सुंदर जाति, छंद आणि वृत्तांचा वापर करून रचण्यात आली आहेत. सुसूत्र निवेदनाने ती एकत्र ओवली गेली आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या आनंददायी आणि उद्बोधक लीलांचा हा गोपाळकाला सर्वच रसिकांना रिझवून जावो हीच त्रिभुवनमोहन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !