-
Lokshahi Aani Hukumshahi (लोकशाही आणि हुकूमशाही)
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्यााच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्यास विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्यांेना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सशक्त लोकशाहीसाठी अत्यावश्यक असलेले विचारमंथन लोकशाही आणि हुकुमशाही
-
Manatil Maanas (मनातील माणस)
आपल्या जवळच्या माणसांच्या आठवणी कायम आपल्या मनात ताज्या असतात. त्यात आई-वडील, कुटुंबीय शिक्षक, स्नेही, मित्र-मैत्रिणी यांचा समावेश असतो. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर त्यांनी त्यांच[...]
-
Mahatma Gandhi Aani Bhartiya Rajyaghatna (महात्मा
महात्मा गांधीनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वतंत्रपूर्व काळात राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनामद्धे समंत झालेल्या अनेक ठरवांमध्ये गांधीजीच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वतंत्र मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरनिशी फारशी सुसंगत आहे. असे म्हणता येत नाही. असे का झाले. असावे? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मुलभुत मतभेद का असावे? महात्मा गांधी आणि वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये मुलभुत मतभेद का होते? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती? आशा विविध प्रश्नाची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या इतिहासही उलगडून दाखवणारे एका जेष्ट न्यायविदाचे हे पुस्तक.... गांधीजींच्या व्यक्तमत्वाचे एका आगळ्या पैलुवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच. पण काही मुलभुत राष्ट्रिय प्रश्नाची पुनर्विचार करण्यास वाचाकांना प्रवृतही करते.