-
Khajinyachi Shodhyatra (खजिन्याची शोधयात्रा)
खजिन्याची शोधयात्रा साधारण आठशे/नऊशे वर्षांपूर्वीपर्यंत आपला देश हा जगातला सर्वात समृद्ध, संपन्न आणि ज्ञानवान देश होता. जगातला एक तृतीयांश पेक्षा जास्त व्यापार फक्त आपण करायचो. हे सर्व करत असताना आपण अनेक नवनवीन शोध लावले. मानवी मनाला थक्क करणारी अनेक मंदिरं, अनेक वास्तू, अनेक राजप्रासाद उभारले. समरस समाजासाठी, न्याय पद्धतीसकट, अनेक उन्नत आणि प्रगल्भ व्यवस्था निर्माण केल्या. गणितातल्या गमती केल्या. अनेक उत्तमोत्तम खेळ शोधून काढले. कलेच्या क्षेत्रात भरारी घेतली. असं बरंच काही ... दुर्दैवानं भारतीय ज्ञानाचा हा खजिना आमच्यापर्यंत फारसा कोणी आणलाच नाही. या खजिन्याचा शोध आणि वेध घेण्याचा हा मनस्वी प्रवास ..! 'खजिन्याची शोधयात्रा' हे श्री. प्रशांत पोळ या उद्योजकाचे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा एक समृद्ध आणि अक्षय खजिनाच गवसला असे वाटले! -डॉ. गो. बं. देगलूरकर