-
Bonsay (बॉनसाय)
आधुनिक काळात अनीतिमान व्यवहाराला प्रतिष्ठेचे स्वरूप येऊ लागले आहे. स्वाथी मनोवृत्ती वाढू लागली आहे. मोठ्या मानाच्या प्रतिष्ठेचा जागेवर फार छोटी, खुरट्या मनोवृत्तीची, अनीतिने वागणारी माणसे स्थानापत्र होऊ लागली आहेत... शिक्षण-क्षेत्रातही नैतिक मूल्यांची घसरण होत आहे. सत्तास्पर्धा, भ्रष्टाचार शिक्षणक्षेत्रात बोकाळला आहे. शिक्षणक्षेत्रातील अशा भ्रष्ट व्यवहाराचे चित्रण सुभाष भेण्डे यांनी समर्थपणे `बॉनसाय’ या कादंबरीतून केले आहे. -विश्र्वनाथ शिंदे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कादंबरीतील प्रसंग, प्रसंगांचा तपशील, त्यांत वावरणारी आणि भाग घेणारी पात्रे कादंबरी वाचत असताना माझ्या डोळ्यांसमोर पिंगा घालत होती. त्यातील प्रत्येक पात्र पुणे विद्यापीठातीलच आहे, असा मला भास होत होता. कादंबरीमध्ये विद्यापीठ कारभाराच्या अनेक प्रकरणांचे पुरेपूर प्रतिबिंब पडलेले आहे हे कोणाही जाणकाराच्या सहज ध्यानात येईल. प्रा. एन. सी. (शरद) जोशी कार्यकारिणीचे माजी सदस्य, पुणे विद्यापीठ आशय, विषय आणि मांडणी या सर्वच दृष्टींनी कादंबरी सुदृढ झाली आहे. अशा लेखनातून आत्मिक समाधानाबरोबरच चिंतनाला एक दिशासुद्धा मिळत असते यात शंका नाही. - प्रा. सदानंद देशमुख - जानेफल, जि. बुलढाणा `बॉनसाय’मधील प्रवृत्ती मूलतः मानवी प्रवृत्ती आहे. आजही ही किडलेली प्रवृत्ती समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणे पवित्र समजल्या जाणार्या विश्र्वविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात कशी फोफावली आहे याचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आले आहे. - प्रा. विद्या प्रभुदेसाई - फोंडा, गोवा
-
Chashak Aani gulab
भेण्डे यांनी युरोपच्या प्रवासात नुसतीच चैन केली नाही किंवा नुसत्या बघ्यासारखे देश पाहिले नाहीत. त्यांच्यातला अर्थशास्त्रज्ञ, ललित लेखक आणि चौकस सुशिक्षित महाराष्ट्रीय माणूस सतत आणि सर्वत्र जागरूक होता. शक्यतोवर त्यांनी तिथले लोक पाहिले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यांच्या देशांची स्थिती, त्यांची सुखदुःखे जाणून घेतली. पुष्कळ ठिकाणी ते प्रवासी बस सोडून एकटेच स्वतंत्रपणे हिंडले. त्यामुळे `कंडक्टेड’ प्रवासी सामान्यतः जे पाहत नाहीत ते भेण्डे पाहू शकले.