-
Eka Punarjanmachi Katha (एका पुनर्जन्माची कथा)
डॉ. मनोज भाटवडेकर यांनी सांगितलेली एका डॉक्टरचीच ही एक कहाणी आहे. इतरांना आजारातून बरे करणाऱ्या आणि जगण्याची उभारी देणाऱ्या डॉक्टरलाच एक दुर्धर रोगाने त्रासले, तर काय होईल....या कहाणीतील डॉक्टरला अशाच एका दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. वैद्यकीय उपचारांना काही फारसं यश येत नाही. मनही खचल आहे;पण चारही बाजूंनी आलेल्या संकटातून एक मार्ग समोर येतो. जादू झाल्यासारखा तो आजारातून बरा होतो. खर तर चमत्कार झाल्यासारखा त्याचा पुनर्जन्मच होतो. एक वेगळं आयुष्य सुरु होतं.या प्रवासाचीच ही कहाणी आहे. वाचनाचा वेगळा अनुभव देणारी आणि वेगळा विचार घेऊन वाचकापर्यंत पोहोचलेली.!!डॉ. मनोज भाटवडेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या आयुष्यात एका आजारानंतर घडलेल्या क्रांतिकारी बदलाची कहाणी दिली आहे. डॉ. भाटवडेकर यांनी आपल्याला ध्यानधारणेचा कसा फायदा झाला, तसंच या काळात त्यांच्यात जे बदल झाले त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. ओशो यांच्या तत्त्वज्ञानाचा भाटवडेकर यांच्यावर कसा प्रभाव पडला, ते त्यांनी यात दिलं आहे. यात आध्यात्मिक बाजूचा आग्रह नाही किंवा असं केल्याने आजार बरा झाल्याचा दावाही नाही. मन आणि बुद्धी यांचा वापर कसा करायचा, दोन्हींतील कुठली गोष्ट कधी ऑन ऑफ करायची, ते मला कळतं. असं भाटवडेकर सांगतात.