-
Jamilchya Sahaskatha (जमिलच्या साहसकथा)
जमिल राहत असलेल्या तातासी प्रदेशात दोन महत्वाच्या, पण दु:खद घटना घडतात आणि सगळ्या गोष्टी बदलूनच जातात! मोठ्ठा भूकंप होऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे मुख्य भूभागापासून तातासी तुटून वेगळं होतं आणि त्याचं रुपांतर एका बेटामध्ये होतं. त्यानंतर लगेचच, समुद्रात एक राक्षस असल्याचं लक्षात येतं आणि तो बेटवासीयांना त्रास देऊ लागतो, त्यांची अडवणूक करून ठेवतो. जमिल आणि त्याच्या प्रत्येक मित्राचं एकच स्वप्न असतं - एके दिवशी या राक्षसाला चांगलाच धडा शिकवायचा आणि सगळ्या बेटवासीयांना भीती आणि असुरक्षितता यांपासून मुक्त करायचं. जमिलचं आणखीही एक स्वप्न असतं - हरवलेली किल्ली शोधण्याचं! कारण या किल्लीमुळेच भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून तातासी बेटवासियांचा बचाव ह्पोणार असतो. साहसी योजना आखून समुद्रराक्षसाला तर जमिल हरवतो, पण त्याचं पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी त्याला वाळवंट पार करावं लागतं, सामुद्रीचाच्यांना तोंड द्यावं आणि भयंकर चीमेरांशीही सामना करावा लागतो........ हि कथा आहे एका मुलाची,त्याच्या स्वप्नांची आणि त्यासाठी त्याने केलेल्या दिव्य साहसांची...