-
Shivachi Saat Rahasye (शिवाची सात रहस्ये)
शिवशंकराच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांड यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्ये बंद आहेत. त्यांपैकी सात रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयन्त देवदत्त पट्टनायक यांनी या पुस्तकातून केला आहे. पाहिल्या प्रकरणात शिवलिंगाचा खरा अर्थ सांगितला आहे. दुसऱ्या प्रकरणातून मानवसमूहाच्या प्रादेशिक वर्तणुकीबद्दल शिवाला वाटणारा संताप व तिरस्काराबद्दल लिहिले आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रकरणात शिवला जगाकडे दयार्द नजरेने पाहायला देवी कसे शिकवते याबद्दल माहिती आहे. पाचव्या व सहाव्या प्रकरणात शिवाचे दोन पुत्र गणेश व मुरुगन यांच्यासंबधात माहिती आहे, तर अखेरच्या प्रकरणात शिव नृत्यकलेमधून ज्ञानप्रदान करणारा जाणकार शिक्षक कसा आहे, ते सांगितले आहे.
-
Vishnuchi Saat Rahasye (विष्णूची सात रहस्ये)
हिंदू धर्मात भगवान विष्णू हा देव केंद्रस्थानी आहे. सृष्टीचे नियमन करणाऱ्या विष्णूबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. विष्णूची प्रतीके व संस्काराच्या कर्मकांडाबद्दल सातत्याने सांगितले जाते. जगाच्या कल्याणासाठी जे नऊ अवतार होऊन गेले ते विष्णूचेच असल्याचे मानले जाते. विष्णू देवतेचे महत्व, कथा, प्रतीके, त्याचे संसारी रूप देवदत्त पटनायक यांनी 'विष्णूची सात रहस्ये 'मधून उलगडली आहेत. यात विष्णू, ब्रह्मा, इंद्र या देवांची निर्मिती, त्याच्या मानवाशी निगडीत संदर्भ दिले आहेत. नारदाची जन्मकथाही आहे. विष्णूचे मत्स्य, कूर्म, वामन, नरसिंह, राम, कृष्ण आदी अवतार, त्यांची कथा, त्यांचे कार्य, मनुष्याची निर्मिती, त्यांच्या मदतीसाठी धावून आलेला विष्णू, माणसांमध्ये पूजल्या जाणाऱ्या विष्णूची विविध रूपे, बलरामाचे महत्त्व, शुभ्र घोड्यावर बसलेला आणि हातात तलवार घेतलेला योद्धा म्हणजे साऱ्या गोष्टींचा नाश करणारा विष्णूचा कल्की अवतार व या सर्वांचे मनुष्याच्या आयुष्याशी व वर्तनाशी जोडलेला संबंध यांचे रहस्य आपल्यापुढे यातून मांडले आहेत.
-
Videshi Kanya (विदेशी कन्या)
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुले कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत,हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या आजीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्माच्या लोकांविषयी जे काहीं आजवर ऐकलेले होते, त्याहीपेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतींचा मिलाफ असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पूर्वजांबद्दल माहिती मिळऊ लागते. त्यातच आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू),आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (खिश्चन) अशा विचारचक्रात ती अडकते...