-
Ahe Loktantra Tarihi (आहे लोकतंत्र तरीही)
आज आपल्या देशात लोकशाही नांदत असतानाही काही वैगुण्यांनी देशाची कामगिरी झाकोळली जात आहे. अशी वैगुण्ये कोणते, समाजात अजून कोणत्या उणीवा राहिल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, अशा प्रश्नांची चर्चा डॉ. सहसबुद्धे यांनी आपल्या या 'आहे लोक-तंत्र तरीही...' या लेख-संग्रहात केली आहे. डॉ. सहसबुद्धे एखाद्या राजकीय किंवा सामाजिक घटनेकडे पाहून किती वेगवेगळ्या अंगांनी विचार करतात, याची उदाहरणे या लेख-संग्रहात अनेक पानांवर आढळतात.