-
Bhogale Je Dukh Tyala
माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढ-या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबल मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या टाचेखाली ती तुडवत आली. माझं अख्खं आयुष्य जणू तिनं आपल्यासाठी एक वस्तू मानली. केवळ एक वस्तू, जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं. स्वत:साठी, स्वत:च्या गरजपूर्तीसाठी. मा नं माझं आयुष्य आपल्याकडं गहाण ठेवलं. मला माझ्या गुलामीची प्रखरतेनं जाणीव झाली. यातून आपण सुटायला हवं, नव्हे सुटका करून घ्यायला हवी. "घाबरूनकोस. कितीही वादळ होऊ दे, विझू देऊ नकोस त्या आशेच्या पणतीला. आत्ता हरलीस तर मग पुढं कधीच नाही. कधीही नाही." मी स्वत:ला पुन:पुन्हा बजावत होते. स्वत:च स्वत:ला धीर देत होते.