-
The Racketeer (द रॅकेटीअर)
माल्कम हा कादंबरीचा ४३वर्षीय, कृष्णवर्णीय वकील असलेला नायक. ‘माजी मरीन्स’अशीही त्याची ओळख असते. या सरळमार्गी व हुशार वकिलावर तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्याचं कौटुंबिक, व्यावसायिक जीवन धोक्यात येतं. पाच वर्षांनंतर माल्कमला सुटकेचा मार्ग दिसतो. ‘जज फॉसेट’ व त्याची सेक्रेटरी ‘मिस क्लेअर्स’ यांचा खून होतो. याचा फायदा माल्कमला तुरुंगातून सुटण्यासाठी होतो. तो खुन्याचं नाव सांगतो आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्याची तुरुंगातून सुटका होते. प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा बदललेल्या आणि नावही बदललेल्या माल्कमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतो. चित्रपट निर्माता म्हणून वावरत असताना तो नाथन कूले या व्यक्तीवर माहितीपट बनवतोय, हे दाखवून नाथनकडून लपवलेलं सोनं कुठं आहे, हे जाणून घेऊन ते मिळवतो. ते सुरक्षित बँकेत ठेवतो. एकूण कसा रंगतो माल्कमच्या जीवनाचा हा नवीन अध्याय? थरारक वळणांनी पुढे सरकत राहणारी एका वकिलाच्या बुद्धिचातुर्याची उत्कंठावर्धक कथा.
-
The Stonehenge Legacy (द स्टोनहेंज लेगसी)
एका माणसाचा बळी देण्यात येतो, एक बुद्धिमान पुरातत्त्व शास्त्रज्ञ आत्महत्या करतो, अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षाची मुलगी तिच्या प्रियकरासह बेपत्ता होते... या तीनही घटनांचा परस्परांशी संबंध आहे...आत्महत्या केलेल्या पुरातत्त्व शास्त्रज्ञाचा मुलगा गिडियनला माणसाचा बळी देणाऱ्या गूढ पंथाची सगळी माहिती मिळते...या तीनही घटनांचा तपास करणारी सीआयडी इन्स्पेक्टर मेगन बेकर या तीन घटकांमधील परस्परसंबंध शोधून काढते... स्टोनहेंज येथील पवित्र शिळा, त्यांच्याभोवती असलेला देवांचा (सेक्रेड्सचा) वास, तो वास तिथे चिरंतन राहावा म्हणून गूढ पंथातील लोक देत असलेले बळी...अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या मुलीला ते बळी द्यायचं ठरवतात... दरम्यान, केटलीनच्या शोधासाठी पोलीस, सीआयडी आणि एक खासगी गुप्तहेर संघटना कसून तपास करत असतात...गिडियनही तिच्यापर्यंत पोहोचतो आणि तिच्या सुटकेचा प्रयत्न करतो... गिडियन तिच्यापर्यंत कसा पोहोचतो...तो तिची सुटका करण्यात यशस्वी होतो का... एक थरारक, रहस्यमय कादंबरी
-
Atmavanchana (आत्मवंचना)
सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
-
The Odessa File (द ओडेसा फाइल)
सॉलोमन टाउबर या ज्यू व्यक्तीने लिहिलेल्या डायरीत छळ छावणीत हिटलरच्या एस. एस. संघटनेकडून ज्यूंवर केल्या गेलेल्या अनन्वित अत्याचारांचे, विशेषत: रोशमन या एस.एस. अधिकाऱ्याच्या क्रूरतेचे वर्णन असते. सॉलोमन आत्महत्या करतो आणि ती डायरी पोलिसांच्या हाती लागते. नंतर तरुण जर्मन पत्रकार पीटर मिलरच्या हाती ती डायरी लागते. ती डायरी वाचून मिलर रोशमनचा शोध घ्यायचा, असं ठरवतो. जेव्हा मिलर ती डायरी वाचतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. ज्यूंच्या हत्याकांडाबरोबरच त्या डायरीतील आणखी एक बाब त्याला रोशमन या क्रूरकम्र्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करते. ती बाब कोणती याचं रहस्य कथानकाच्या शेवटी उलगडतं. रोशमनला शोधण्यासाठी मिलरला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, याची कहाणी ‘द ओडेसा फाईल’ या कादंबरीतून चित्रित केली आहे. मिलरचा या शोध मोहिमेच्या दरम्यानचा प्रवास चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक आहे. तो प्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. तो अनुभवण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.
-
Diamonds Are Forever (डायमंड्स आर फॉरएव्हर)
टिफानी म्हणाली, "हे बघ बाँड, मला बेडमध्ये यायला राजी करण्यासाठी क्रॅबमीट रेविगोट पुरेसे नाही आणि काहीही झालं तरी बिल तू देणार असल्यामुळे मी कॅव्हियार घेणार आणि तिच्याबरोबर तुम्ही इंग्लिश लोक ज्याला कटलेट म्हणता ते आणि पिंक शँपेन." टिफानी केस - आकर्षक, सोनेरी केसांची, भेदक नजरेची, बेफिकीर वृत्तीची मुलगी, जिच्यामुळे कोणीही सहज संकटात सापडू शकेल ! हि-यांचे स्मगलिंग करणारी टोळी आणि जेम्स बाँड यांच्यामध्ये ती उभी राहिली. अफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत पसरलेल्या या टोळीत हेरगिरी करण्यासाठी बाँडने तिला वापरले. पण अमेरिकेत खुद्द तोच संकटात सापडला आणि त्याला अनपेक्षित मदत लाभली ती या टिफानीची.
-
Alive ( अलाइव्ह )
चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग एवढाच आसरा त्यांना उरला ! थोडीशी वाईन व काही चॉकलेटे एवढेच खाद्य ! अपघात झाला तेव्हा फक्त 32 जण वाचले होते. काही दिवसात 27 उरले. मग 19 आणि शेवटी फक्त 16 ! शेवाळेसुद्धा नसलेल्या बर्फाच्छादित उंचीवर ते 72 दिवस कसे जिवंत राहिले ? कसे वागले ? त्यांची सुटका कशी झाली ? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले ? याची रोमांचकारी सत्यकथा !
-
The Associate (द असोसिएट)
पेनिसिल्वानिया मधील यार्क गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय ये कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतो. "येल लॉ जर्नल'' चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावतो. कॉलेजच्या चार वर्षांमधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित काही लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावा लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला - दाखविले जाते. एका मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्" बनविणाऱ्या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या अस्तित्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का? हे या कादंबरीतच वाचायलाच हवे.
-
Diamonds Are Forever
टिफानी म्हणाली, "हे बघ बाँड, मला बेडमध्ये यायला राजी करण्यासाठी क्रॅबमीट रेविगोट पुरेसे नाही आणि काहीही झालं तरी बिल तू देणार असल्यामुळे मी कॅव्हियार घेणार आणि तिच्याबरोबर तुम्ही इंग्लिश लोक ज्याला कटलेट म्हणता ते आणि पिंक शँपेन." टिफानी केस - आकर्षक, सोनेरी केसांची, भेदक नजरेची, बेफिकीर वृत्तीची मुलगी, जिच्यामुळे कोणीही सहज संकटात सापडू शकेल ! हि-यांचे स्मगलिंग करणारी टोळी आणि जेम्स बाँड यांच्यामध्ये ती उभी राहिली. अफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत पसरलेल्या या टोळीत हेरगिरी करण्यासाठी बाँडने तिला वापरले. पण अमेरिकेत खुद्द तोच संकटात सापडला आणि त्याला अनपेक्षित मदत लाभली ती या टिफानीची.