-
Pearls Of Wisdom (पर्लस् ऑफ विजडम-ज्ञानसागरातील मो
छन्नी हातोडीचे घाव सोसल्याशिवाय दगडाचं मूर्तीत रूपांतर होत नाही. आगीची झळ सोसल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही. त्याचप्रमाणे मोतीही बिकट परिस्थितीतून गेल्यावरच महत्त्व प्राप्त करतो. ध्येयाच्या दिशेने यात्रा करत असतानाही माणसाला कित्येक संकटांना सामोरं जावं लागतं. यशप्राप्तीच्या मार्गावर येत असलेल्या संकटांवर मात करून ध्येय कसं साध्य करायचं याचं प्रशिक्षण जगभरातील सुप्रसिद्ध प्रशिक्षकांनी या पुस्तकामधून मांडलं आहे. आपआपल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असलेल्या 30 प्रशिक्षकांनी त्यांच्या जीवनाचं सार आणि यशाचं रहस्य या पुस्तकामध्ये अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने लिहिलं आहे.