-
Vyavasthapanatil Kathakali (व्यवस्थापनातील कथाकली)
व्यवस्थापनावर चटकदार लेखन असू शकते हे पटायला श्री नारायण जोगळेकर ह्यांचे "व्यवस्थापनातील कथाकली" हे पुस्तक वाचावे. हातात धरले कि पूर्णपणे वाचून झाल्याशिवाय ठेववत नाही. अगदी गृहिणींपासून ते एम.बी.ए. विद्यार्थी, प्राध्यापक, वरिष्ठ अधिकारी आणि कार्खान्दारांपर्यंत सर्वांनाच जोगळेकरांची शैली वेधक वाटावी. एस.एस.सी. ला बोर्डात चवथा नंबर , आय.आय.टी. पदवीधर , वीस वर्षे प्रत्यक्ष शॉप फ्लोरचा अनुभव, इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य, अपंग पुनर्वसन संस्थेचे डायरेक्टर, उत्पादकता सल्लागार अशा रीतीने चौफेर क्षेत्र विस्तार्तांनाच त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया , टाटा प्रेस , सकाळ, महाराष्ट्र टाईम्स मधील विपुल लेखनाने त्याचा प्रत्यय, लाभ वाचकांना दिला आहे. छोट्या मोठ्या प्रत्यक्ष घटना, किस्से, केस स्टडी ह्यांबरोबरच स्वतः काढलेल्या रेखाचीत्रांचीही त्यांनी मुबलक पखरण केली आहे. सर्वांनी मजेत वाचायचे असे पुस्तक.