-
Divyatwachi Jeth Pratiti (दिव्यत्वाची जेथ प्रतीती)
श्री. प्रवीण कारखानीस हे मराठी जगतातील “एकमेवाद्वितीय” म्हणता येईल, असे व्यक्तिमत्व आहे. जीवनावर भरभरून प्रेम करणारे आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांना साहसाने सामोरे जाणारे कारखानीस, आपल्या अनुभवांनमध्ये इतरांना सहभागी करून घेऊ इच्छितात व त्यासाठी लेखन हे माध्यम निवडतात. साहजिकच, त्यांचे लेखन इतरांपेक्षा वेगळे होते; एकमेव म्हणावे इतके! प्रस्तुत पुस्तकातूनही त्यांच्या या जीवनाभिमुखतेचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कला, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रांमधील 'आयडॉल' मानल्या गेलेल्या मान्यवरांचे वर्णन, कारखानीस समरसून करतात. त्यांच्या लेखणीचा गुणधर्मच असा आहे की, वाचकांनासुद्धा वाचताना तसेच समरस व्हावे लागते. कारखानीसांच्या अनुभवांची व्याप्ती अशीच वाढत राहावी व त्या अनुषंगाने मराठी वाचकांच्या वाचनाचा पैसही ! - डॉ. सदानंद मोरे
-
A Mascud Pakistan
एखाद्या गूढ, अनाकालनीय गुहेप्रमाणे ज्या देशाबद्दल कायम कुतूहल वाटत आलं, ज्या देशाच्या मानसिकतेबद्दल कायम तर्क-वितर्क करणं हाच सा-या जगाचा छंद झाला, त्या देशाचा नुसता प्रवास न करता, त्या देशाचा भाव व स्वभाव, जीवनाचे शेकडो अल्वार कप्पे उलगडण्याचं मोलाचं काम श्री. प्रवीण कारखानीस यांनी या पुस्तकाद्वारे केलं आहे.
-
Famous Festivals of India
In India the celebrations of festivals form a wondrous anf joyful series of events, marking the rites of passage between birth, death and renewal.