-
Ra.Dho.Karve (र.धों.कर्वे )
विसाव्या शतकाच्या शुभारंभाच्या वर्षात (१९०१) रघुनाथ धोंडो कर्वे नावाच्या अवघ्या एकोणीस वर्षाचा तरुण, संततिनियमनविषयक मते मांडतो, त्याचं महत्व ओळखतो, ही गोष्टच इतकी महत्वाची आहे, की एकविसाव्या शतकातला आपल्या देशातल्या लोकसंख्येचा विस्फोट पाहता, या दृष्ट्या माणसाने संततिनियमनाचे महत्व शंभर वर्ष आधी ओळखले होते; याचा विस्मय वाटतो. प्रो. रघुनाथ धोंडो कर्वे यांचे हे कार्य आज कालबाह्य वाटण्यासारखे तर नाहीच; उलट आजच्या विज्ञानप्रगत काळातही त्याचे महत्व जास्तच अधोरेखित होते.