-
Maza Motivatar Mitra (माझा मोटिव्हेटर मित्र)
माझा मोटिव्हेटर मित्र हे अगदी सरळ, सोपं, हलकंफुलकं परंतु तितकंच विचारपरिवर्तन करणारं आणि प्रेरणादायी असं आगळंवेगळं पुस्तक आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अग्रगण्य प्रशिक्षक अतुल राजोळी यांनी या पुस्तकात यशप्राप्तीचे ५० निरनिराळे मैत्रिपूर्ण कानमंत्र दिले आहेत. 'कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळी, त्याला आवश्यक मार्गदर्शन व मोटिव्हेशन देंण' असा अतुलचा या पुस्तक मागील खरा हेतू आहे. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रभावी तंत्रं या पुस्तक मध्ये त्यांनी अतिशय सहज शैलीत मांडली आहेत. आपल्या आयुष्यात उत्तुंग प्रगती साधण्यासाठी, आपली वैयाक्तिक आणि व्यावसायिक स्वप्नं साध्य करण्यासाठी या पुस्तकातील परिणामकारक कानमंत्र नक्कीच मार्गदर्शक ठरतील. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्यासोबत प्रत्येक क्षणी हा मोटिव्हेटर मित्र साथ देण्यासाठी तत्पर असेल.