-
Najuka (नाजुका )
ईश्वराची या जगातील सरवाश्रेष्ट निर्मिती म्हणजे विचारशील माणूस होय. विचार सारेच करतात, पण ते प्रभावीपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य काहींमध्ये असते. ते वक्ते बनतात, ते साहित्येक बनतात, ते कवी बनतात. कविता हे विचार प्रकटीकरराचे प्रभावी माध्यम आहे. विचारांना भावनेची जोड मिळाली की कविता निर्माण होते. क्रौंचवध पाहून झालेल्या तीव्र शोकभावनेतून वाल्मिकी मुनींकडून आदिकव्य रामायण घडले. प्रस्तुत कवीची पहेली कविताही पितृशोकाच्या प्रसंगी अभावितपणे जन्मली. कवीच्याच सांगण्यानुसार त्याची भाषा शक्ती मर्यादित असेल, कल्पनाशक्तीही मोठी नसेल; पण त्याच्यामधले तरल संवेदनाक्षमता तर निश्चितच आहे आणि मनात उमटलेल्या उत्कट संवेदना शब्दरूपात मांडण्यामध्ये पारदर्शक प्रांजळपणा आहे.त्यामुळे या कवीच्या सध्या सरळ कविता आपल्या मनाला भिडतात आणि विचार प्रवृत्तही करतात. प्रेमासारख्या नाजुकं विषयावरबरोबर कवीने कष्टकरी, शेतकरी वर्ग, दुष्काळ, बेकारी, हुंडाबळी, शिक्षणप्रणाली, अशा सामाजिक विषयांवर मनात उमटलेले आवर्तही चांगल्या रीतीने कवितेत पकडले आहेत. पण या कवीचे बलस्थान म्हणजे या संग्रहात असलेल्या चारोळ्या असे मला वाटते. कारण कवीला सुचणा-या चमकदार कल्पना, मोजक्या शब्दात चारोळ्यांमधून मांडलेल्या दिसतात आणि त्यामुळे या चारोळ्या आस्वाद्य होतात