-
Surbhi (सुरभि)
जे जे सुंदर, ते ते पवित्र, मंगल अशा भावनेने जगाकडे वास्तवाकडे पहाण्याचा सुप्रिया नाईक यांचा दृष्टीकोन. विविध विषयांना स्पर्श करत मोजक्या तरीही रेखीव शब्दांत काव्य गुंफले आहे. त्या बी.एड्. असून साहित्याची, लेखन वाचनाची आवड वेचक आणि वेधकपणे जोपासली आहे. गेली ४० वर्षे त्यांचा लेखन प्रवास सुरु असून लोकसत्ता (काव्यरंग), मासिक रोहिणी व इतर नियतकालिकांतून कथा, काव्य रसिक पर्यंत पोचले आहे. २००७ साली स्टेट बँक ऑफ इंडियातून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली व आता साहित्य क्षेत्रात मुक्तपणे व स्वच्छंदपणे विहरत आहेत.