-
Vajanatil Chadhautar (वजनातील चढउतार)
भारतातील लठ्ठपाणावरील वैद्यकीय चिकित्सेचे जन्मदाते म्हणून डॉ. विनोद धुरंदर यांना ओळखले जाते. १९४५ साली एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बालचिकित्सेवरील पदवी मिळविली. त्यानंतर हेक्स्ट ङ्गार्मा, पार्क डेव्हिस ङ्गार्मा या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. मुंबई महानगर पालिकेचे दवाखाने आणि शाळा यांमधून वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्याचप्रमाणे मुंबईतील केइएम इस्पितळातही काही काळ ते कार्यरत होते. सुरुवातीच्या काळात स्वतः लठ्ठ असलेले डॉ. विनोद धुरंधर यांनी स्वतःवरच वजन कमी करण्याचे विविध प्रयोग केले आणि नंतर लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये उपचार केंद्र सुरू केले. पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपचार केंद्राचा आजवर सुमारे पावणेदोन लाखांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. All India Association for advancing Research in Obesity ( AIAARO) ‘ना नफा ’ तत्त्वावर चालणार्या व्यावसायिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अन्न आणि आहार या विषयावर एम.एस. पदवी प्राप्त केलेले डॉ. निखिल धुरंधर हे डॉ. विनोद धुरंधर यांचे पुत्र असून लठ्ठपणा या विषयावरील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. रॉचेस्टर सेंटर फॉर ओबेसिटी रिसर्च ऍण्ड ट्रिटमेंट या संस्थेचे मानद संचालक म्हणून काही वर्षे डॉ. विनोद धुरंदर कार्यरत होते. ‘द ओबेसिटी सोसायटी’ या संस्थेच्या विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते अमेरिकेतील पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटर, इन्फेक्शन्स ऍण्ड ओबेसिटी लॅबोरेटरी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी’, ‘ओबेसिटी रिसर्च’, ‘द ओपन ओबेसिटी जर्नल’ या लठ्ठपणाशी संबंधित नियतकालिकांच्या संपादकीय कार्यकारिणीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडियाचा १९९० सालचा ‘युवा वैज्ञानिक पुरस्कार’ त्यांना लाभला होता.