-
Chokar (चोकर)
स्त्रीच्या वेदना स्त्री चांगली जाणू शकते... कारण ती तिची नुसती सवेंदना नसते टार सहवेदना असते... पण जेव्हा जेव्हा पुरुष स्त्रीची वेदना जाणतात, वेदनेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा माझे मन आनंद्चिंब होते; कारण स्त्रीचं दुःख, तिच्या मनाची तडफड, तिची कुचंबना जाणणारा, टीप कागद अजुनही इथे तिथे अस्तित्वात आहे जो स्त्रिसाठीकही सुखाचे क्षण घेउन येणार आहे ही जाणीव त्या त्या क्षणी मनात नव्याने जन्म घेत रहते आणि आशेचे किरण पुन्हा पुन्हा मन पुलकित करीत रहातात. संजीव पाध्ये ह्यांनी रंगविलेल्या सर्व कथानायिका काल्पनिक असल्य तरी त्यांची घुसमट, त्यांची कोंडी मात्र काल्पनिक नाही. ते सार्वत्रिक सत्य आहे. प्रत्येकाने अवर्जुन वाचावे असे हे पुस्तक आहे.