-
Sex Scotch And Scholarship (सेक्स स्कॉच अँड स्कॉलर
खुशवंत सिंग म्हणजे एक बहुरंगी आणि बहुढंगी असे व्यक्तिमत्त्व, साहित्य, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील स्तंभलेखन यामुळे ते भारतात व परदेशातही वाचकप्रिय लेखक आहेत.‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या त्यांच्या निवडक लेखसंग्रहात काही सेक्स, थोडी स्कॉच आणि बरंच काही स्कॉलरशिप, अशा विषयांवरील लेख आहेत. त्यांचे निसर्गप्रेम, पंजाब प्रश्नाबाबतची आस्था, जगातील सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्याचबरोबर स्वत:च्या शीख धर्माचे संशोधन, या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि उत्कट विवेचन ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. खुशवंत सिंग यांचे खास खुसखुशीत आणि परखड शैलीत केलेले स्वत:चे सविस्तर असे लिखाण हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. किंबहुना खुशवंत सिंग यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांपैकी हे परिपूर्ण असे व्यक्तिचित्र आहे. खुशवंत सिंग यांच्या ‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या पुस्तकातील एकूण लेखनाचा केंद्रबिंदू हा ‘माणूस’ आहे, म्हणून हे लेख वाचताना प्रत्येकजण नकळत अंतर्मुख होतो.
-
Train To Pakistan (ट्रेन टू पाकिस्तान)
खुशवंतसिंग यांची ही गाजलेली कादंबरी १९५६ मध्ये प्रकाशित झाली होती. मात्र आजही या कादंबरीची लोकप्रियता कमी झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाच्या झालेल्या फाळणीची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे. राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत असतात त्याचे पडसाद भारत - पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या लहानशा गावांमध्ये कसे उमटतात, त्याचे चित्रण त्यातून केले आहे. तेथीलच एका गावात शीख आणि मुस्लिम बंधुभावाने राहात असतात. फाळणीशी त्यांचा संबधीही नसतो. शिखांच्या मृतदेहांनी भरलेली ट्रेन अशा घटना - प्रसंगांनी व्यापलेल्या या कादंबरीचा थरार रोमांच उभे करतो. खुशवंतसिंग यांची खास शैली अनिल किणीकर यांच्या रसाळ अनुवादात उतरली आहे.