-
Tatwachintak Charwak (तत्वचिंतक चार्वाक)
चार्वाक इंग्रजीतून तसेच भारतीय भाषांतून, विशेषता: मराठीतून विपुल लिखाण झाले आहे. त्यात एकतर चार्वाकाची इतिहाससापेक्ष मांडणी करताना चार्वाकाची भारतीय जडवादाशी सांगड घालून मांडणी करण्यात आली आहे. जयराशीच्या संशयवादाला - जी लोकयताची एक शाखा किंवा संप्रदाय मानता येईल - फारसे महत्वाचे स्थान दिले गेलेले नाही. तसेच शुद्ध तात्त्विक अंगाने चार्वाक दर्शनाची चर्चा फार थोडी झाली आहे. चार्वाकचर्चेतील ह्या गंभीर तृटी भरून काढण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.