-
Sanskar (संस्कार)
समाज हा डाळींब्याच्या दाण्यांसारखा असतो. डाळींब फोडलं तरी सगळे दाणे सैरावैरा पळत नाहीत. कुटुंब, शासन, शिक्षण, न्याय, अर्थ अशा विविध समाजिक संस्थांनी मानवी समाज एकत्र बांधलेला असतो. यासंस्थांच्या बळकटीवरच समाजाचं अस्तिव आणि समृद्धी अवलंबून असते; आणि त्यासाठी काही संस्कार आवश्यक असतात. वैज्ञानिक संशोधनातील नेत्रदीपक कारकीर्द बाजूला ठेवून वि. गो.कुलकर्णी यांनी शिक्षण अध्यापन संशोधनाचं क्षेत्र आपुलकीन आपलंसं केलं आणि बघता बघता होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचा वटवृक्ष महाराष्ट्र सारस्वाताच्या प्रांगणात सळसळू लागला. या सा-या प्रक्रियेत 'वि. गो. उर्फ वि. जी. के.नी केलेली ही निरीक्षणं आणि काही निष्कर्ष त्यांच्या सम्यक दृष्टीचा आवाका दर्शवतातच शिवाय त्यांचं थक्क करून टाकणारं अशा - सोष्टवही दाखवतात. अत्यंत प्रगल्भ विचार त्यांच्या भाषेत वाचताना साधा, सोपा, नि आपला कधी वाटू लागतो, याचा पत्तादेखील लागत नाही. प्रत्येक घराला, शाळेला आणि किबंहुना प्रत्येक पिढीला संजीवनी देण्याची क्षमता असलेलं हे संस्कारच अमृत...