-
Bartand Arther Rasel (बर्ट्रांड आर्थर रसेल)
एकोनिसाव्या-विसाव्या शतकातील एक विख्यात, विचारवंत व तत्त्वज्ञ म्हणून रसेलची ओळख आहे. एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, तर्कशास्त्रातील पंडित म्हणून विद्वतेच्या परिघातील त्याचे स्थान मोठे होते. असं असलं तरीही त्यांच्या व्यक्तिमात्वाचे इतर कितीतरी अधिक पैलू हेही तितक्याच तोलामोलाचे राहिले. त्याचे लिखाण मैलिक होते. गणित व तत्त्वज्ञानात त्याने स्वतंत्रपणे स्वात:च्या विचारांची मोलाची भर घातली. त्यानंतरच्या काळात जागातिक परिस्थित जे परिवर्तन आले त्याचा वेध घेउन रासलेले आपल्या वैचारिकतेचे वालन बदलले. पुढे त्याने जे विषय निवडले ते सामजिक प्रश्नान्बाबत होते. त्याविषयी लिहिताना त्याने जे लिहिले ते लोकांना समजेल आशा सुटसुटीत शैलीत. त्यामुले तो सर्व सामजिक स्तरांवर लोकप्रिय ठरला. बौद्धिक क्षमता व सामाजिक भान अखेरपर्यंत उणावले नाही. त्याच्या करकर्तृत्वाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विसाव्या शतकात अबाधित होता. रसेल्ची अव्वल दर्जाची प्रतिभा, वायरल द्रष्टेपणा आणि हाती घेतलेले काम शेवटपर्यंत पुरे करण्याची त्याची जिद्द यांचे मूळ काहीसे त्याच्या पूर्वायुष्यात, अर्थात ज्या परिस्थितीत तो लहानाचा मोठा झाला त्यात मिलते.